कानिफनाथ देवस्थानकडून माणिकदौंडीच्या कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:01+5:302021-05-31T04:17:01+5:30
माणिकदौंडी : माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथील कोविड सेंटरला मढी येथील कानिफनाथ देवस्थानाच्या वतीने ४५ हजार रुपयांच्या मेडिकल साहित्याचे वाटप ...

कानिफनाथ देवस्थानकडून माणिकदौंडीच्या कोविड सेंटरला मदत
माणिकदौंडी : माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथील कोविड सेंटरला मढी येथील कानिफनाथ देवस्थानाच्या वतीने ४५ हजार रुपयांच्या मेडिकल साहित्याचे वाटप करण्यात आले.
माणिकदौंडी येथील प्रशासन आणि लोकसहभागातून रत्न जैन विद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरला मढी देवस्थानच्या वतीने पीपीई किट, हॅण्डग्लोव्हज कॅप, मेडिसीन, व्हिटॅमिनच्या गोळ्या असे ४५ हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले. विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, राधाकिसन मरकड, देवस्थानचे कर्मचारी बाबासाहेब मरकड, वैद्यकीय अधिकारी रूपाली इंगळे, सुभाष कुलकर्णी, तलाठी राजू मेरड, समीर पठाण, बाळासाहेब तिडके आदी उपस्थित होते.
मढी देवस्थान ट्रस्टमार्फत माणिकदौंडी व इतर कोविड सेंटरला होत असलेली मदत कौतुकास्पद आहे. याचा निश्चितच फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना होत आहेत, असे प्रशांत तोरवणे यांनी सांगितले.
---
३० माणिकदौंडी
माणिकदौंडी कोविड सेंटरला मदत देताना मढीच्या कानिफनाथ देवस्थानचे अधिकारी, कर्मचारी.