भावाच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST2021-02-23T04:30:32+5:302021-02-23T04:30:32+5:30

संतोष दत्तात्रय मोरे (वय ४२ रा.वाळुंजफाटा) असे मयताचे नाव आहे. घटनेनंतर नगर तालुका पोलिसांनी संतोष याची पत्नी प्रियंका व ...

With the help of his brother, the wife killed her husband | भावाच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

भावाच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

संतोष दत्तात्रय मोरे (वय ४२ रा.वाळुंजफाटा) असे मयताचे नाव आहे. घटनेनंतर नगर तालुका पोलिसांनी संतोष याची पत्नी प्रियंका व तिचा भाऊ रामेश्वर विठ्ठल दशवंत (रा.ताहराबाद ता. राहुरी) यांना अटक केली. मयत संतोष व प्रियंका यांचे घरगुती कारणातून नेहमीच भांडण होत असे. रविवारी प्रियंका हिचा भाऊ रमेश्वर हा तिच्या घरी आला होता. रात्री संतोष आणि प्रियंका यांचे भांडण सुरू झाले. यावेळी रामेश्वर आणि प्रियंकाने संतोष याला लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच रामेश्वर याने संतोष याच्या डोक्यावर कुर्हाडीच्या तुंब्याने मारल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनेच सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सानप यांनी प्रियंका हिच्याकडे विचारपूस केली तेव्हा रात्री भांडणात पाय घसरून पडल्याने संतोष याचा मृत्यू झाल्याचा बनाव तिने केला. प्रियंका हिच्या बोलण्यात विसंगती जावल्याने सानप यांनी तिची कसून चौकशी केली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान संतोष याचा खून करून रामेश्वर रात्रीच पसार झाला होता. सानप यांच्या पथकाने रविवारी दुपारी त्याला ताहाराबाद येथून अटक केली. याप्रकरणी मयत संतोष याचा चुलत भाऊ संदिप सोपान माेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो २१ आरोपी

मेव्हण्याचा खून करणाऱ्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली.

Web Title: With the help of his brother, the wife killed her husband