नान्नज ग्रामस्थांच्यावतीने आरोळे कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:32+5:302021-05-27T04:22:32+5:30
भाजप ओबीसी सेलच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा मंजुश्री जोकारे, नान्नजचे सरपंच महेंद्र मोहळकर, उपसरपंच संजय साठे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मोहळकर, ...

नान्नज ग्रामस्थांच्यावतीने आरोळे कोविड सेंटरला मदत
भाजप ओबीसी सेलच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा मंजुश्री जोकारे, नान्नजचे सरपंच महेंद्र मोहळकर, उपसरपंच संजय साठे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मोहळकर, अतुल मलंगनेर, लियाकत शेख, संतोष मोहळकर, दिलीप मोहळकर, भाजपा जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस उदयसिंह पवार, आप्पा मोहळकर, सुभाष भोरे, रवी होळकर, फारुख शेख, अमर शेख, संपत रजपूत, हनुमंत ढाळे यांनी नान्नज व पंचक्रोशीतून ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले. सलग तीन दिवस मदत जमा करण्यात आली. तब्बल १२० पोती धान्य व रोख २५ हजार रुपये जमा करण्यात आले. नान्नज ग्रामस्थांनी जमा केलेली मदत पाहून नंदादेवी विद्यालयाच्यावतीने साडेबारा हजार रुपये जमा केले.
नान्नज व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जमा केलेली मदत डॉ. आरोळे कोविड सेंटरला देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याहस्ते डॉ. आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे यांच्याकडे मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सभापती सूर्यकांत मोरे, नान्नज सरपंच महेंद्र मोहळकर, उपसरपंच संजय साठे, भाजप ओबीसी महिला सेलच्या जिल्हा उपाध्यक्षा मंजुश्री जोकारे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस उदयसिंह पवार व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो आहे