अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाºयासह जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:02 IST2020-05-14T16:02:19+5:302020-05-14T16:02:28+5:30
अहमदनगर : शहर परिसरात आणि जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाºयासह जोरदार पाऊस
अहमदनगर : शहर परिसरात आणि जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. अकोले, पारनेर आदी तालुक्यातही वादळी पाऊस झाला.
या अवकाळी पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. फळबागांना या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. गुरुवारी झालेल्या या वादळी पावसाने शेतकºयांचीही दाणादाण उडाली. हा पाऊस अर्धा ते पाऊस तास सुरू होता. अहमदनगर शहरात झालेल्या या पावसाने रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले होते.
अकोले, पारनेर, जामखेड आदी तालुक्यातही वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. सकाळपासून अहमदनगर शहरात उकाडा मोठ्या प्रमाणावर होता. दुपारी उन्हाचा पारा ही ३७ ते ३८ अंशावर होता. परंतु दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने सगळीकडे दाणादाण उडाली. भंडारदरा परिसरात मेघ गर्जनेसह पाऊस झाला. नगर तालुक्यातील निंबळक, टाकळी खातगाव, एमआयडीसी आदी भागातही जोरदार पाऊस झाला.