राहाता तालुक्यात झिमझिम पावसाने खरिपाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:28+5:302021-07-11T04:16:28+5:30

जून महिन्यापासून तालुक्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते; पण सुरुवातीला पावसाचे वेळेवर आगमन झाल्यानंतर पावसाचे अचानक उघडीप दिली. ...

Heavy rains in Rahata taluka saved Kharif's life | राहाता तालुक्यात झिमझिम पावसाने खरिपाला जीवदान

राहाता तालुक्यात झिमझिम पावसाने खरिपाला जीवदान

जून महिन्यापासून तालुक्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते; पण सुरुवातीला पावसाचे वेळेवर आगमन झाल्यानंतर पावसाचे अचानक उघडीप दिली. त्यामुळे यावर्षी खरिपाची पिके वाया जातात की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली होती. १५ जूननंतर राहाता तालुक्यात सलग पाऊस न पडता ठिकठिकाणी पडत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची मशागत करण्यास सुरुवात केली.

जवळपास ८५ मिलिमीटर पाऊस झाल्यावर राहाता तालुक्यातील पेरणीलायक असलेले ३८ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्रापैकी १३ हजार हेक्टर क्षेत्रावर जवळपास ३० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; परंतु १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे व रासायनिक खतांचा खर्च व पुन्हा दुबार पेरणीचे संकट येण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. गुरुवार, शुक्रवार, शनिवार राहाता तालुक्यातील लोणी, बाभळेश्वर, आडगाव, केलवड, खडकेवाके, गोगलगाव, रांजणगाव, रामपूरवाडी, वाकडी, पुणतांबा, चितळी, शिर्डी, राहाता या गावांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडला.

100721\img-20210710-wa0118.jpg

राहाता तालुक्यात झिमझिम पावसाने जीवदान मिळालेले सोयाबीन

Web Title: Heavy rains in Rahata taluka saved Kharif's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.