शेवगाव तालुक्यात वादळी पाऊस
By Admin | Updated: March 27, 2016 23:37 IST2016-03-27T23:34:07+5:302016-03-27T23:37:51+5:30
शेवगाव : आखेगाव, घोटण, आंतरवाली, राक्षी, ठाकूर निमगाव, कऱ्हेटाकळी, एरंडगाव, लाखेफळ, खुंटेफळ, दहिफळ आदी काही गावात रविवारी संध्याकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटात बिगरमोसमी वादळी पाऊस झाला.

शेवगाव तालुक्यात वादळी पाऊस
शेवगाव : शेवगावसह तालुक्यातील आखेगाव, सालवडगाव, खरडगाव, घोटण, आंतरवाली, राक्षी, ठाकूर निमगाव, कऱ्हेटाकळी, एरंडगाव, लाखेफळ, खुंटेफळ, दहिफळ आदी काही गावात रविवारी संध्याकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटात बिगरमोसमी वादळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आधीच दुष्काळाच्या संकटाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेवगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात दमटपणा वाढला होता. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा उघड्यावर ठेवला होता. पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांची कांदा झाकून ठेवण्यासाठी दिवसभर धावपळ सुरू होती. कांद्याचे या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हा पाऊस पुढील काही दिवस असाच टिकून राहिला तर शेतकऱ्यांच्या अधिक नुकसानीची भीती व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस सुरू होता. (तालुका प्रतिनिधी)