भंडारदरा, मुळा धरणक्षेत्रात दमदार पाऊस
By Admin | Updated: July 3, 2016 10:29 IST2016-07-03T10:29:18+5:302016-07-03T10:29:18+5:30
जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात पहाटेपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.

भंडारदरा, मुळा धरणक्षेत्रात दमदार पाऊस
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ३ - जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात पहाटेपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. या तालुक्यात भंडारदरा, निळवंडे व आढळा ही तीन धरणे असून मुळा धरणही याच तालुक्यावर अवलंबून आहे.
दरवर्षी याच तालुक्यातून पावसाला सुरुवात होते. यावर्षी मात्र या तालुक्यातच पाऊस नसल्याने जिल्हा चिंतेत होता. आज पहाटेपासून पाऊस सुरु झाल्याने दिलासा मिळाला आहे.