शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिलदार मनाचा शेतकरी : सरकारला दिले दहा टन पेरूचे दान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:29 IST

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. 

अशोक निमोणकर /जामखेड : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांची माळरानावर सहा एकर शेती आहे. बरडाची शेती पडीक पडण्यापेक्षा या ठिकाणी विहीर खोदून अडीच वर्षांपूर्वी सरदार जातीचे पेरुची त्यांनी लागवड केली. हाडाचे शेतकरी असल्याने योग्य नियोजन व वेळोवेळी सेंद्रिय पध्दतीने खते व औषधे मारून पेरूबाग फुलवला आहे. या पेरूचे प्रत्येक फळ ३०० ग्रॅम वजनाचे असून फळांनी पेरूबाग बहरला आहे.       कोरोनामुळे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. सध्या संपूर्ण फळबागा मार्केट बंद आहे. संदीपान निंबाळकर या शेतकºयाचा पेरू पूर्ण काढण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने गाई-गुरांना पेरू खाऊ घालावा लागत आहे. अशा परस्थितीमध्ये पेरूचे पैसे तर होणारच नाहीत. तो सोन्यासारखा माल नासून जाण्यापेक्षा माणसांच्या मुखात जावा अशी भावना निंबाळकर यांनी व्यक्त केली. अडीच वर्षे फुलवलेल्या या फळबागेसाठी आतापर्यंत चार लाखाच्या आसपास खर्च केला. हा खर्च सहन करून त्यांनी संपूर्ण पेरूची १० टनाची बाग सात लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना कोरोनासारख्या संकटाप्रसंगी सरकारला दान करण्याचा संकल्प त्यांनी केला.      निंबाळकर यांनी शिवूरचे उपसरपंच सिध्देश्वर लटके यांच्याशी चर्चा केली. तत्काळ   तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्याबरोबर संपर्क साधला. ते तत्काळ शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांच्या शेतात जाऊन पेरू बागेची पाहणी केली. यावेळी कामगार तलाठी सचिन खिळे, गणेश निकम, आजिनाथ निकम, बदाम निंबाळकर, नाना सावंत, महादेव झरकर, वसंत निंबाळकर, एकनाथ चव्हाण उपस्थित होते.  

 जामखेड तालुक्यातील गोरगरिब जनतेला, विविध भागातील विधवा, मजूर, दिव्यांग, वयोवृद्ध, गरिब व्यक्तींना हा पेरू कसा पोहोच करता येईल? याचे नियोजन करण्यात येईल. शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचे दु:ख तर आहेच. त्याचबरोबर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक आहे.  -विशाल नाईकवाडे, तहसिलदार, जामखेड. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडFarmerशेतकरी