बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट अर्जावर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:46+5:302021-01-04T04:18:46+5:30
जरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. गेल्या महिनाभरापासून पोलीस त्याचा अविरत शोध घेत आहेत. तो मात्र ...

बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट अर्जावर आज सुनावणी
जरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. गेल्या महिनाभरापासून पोलीस त्याचा अविरत शोध घेत आहेत. तो मात्र प्रत्येकवेळी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे. जरे यांची हत्या झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे एकत्र केले आहेत. आता केवळ बोठे याच्या अटकेेचे आव्हान तपासी यंत्रणेसमोर आहे. पसार होताना बोठे याने स्वत:चा मोबाईल घरीच ठेवला आहे. त्यामुळे लोकेशन काढून त्याचा शोध घेणे हा पर्याय संपलेला आहे. खबऱ्यांकडून मिळणारी माहिती हाच पर्याय सध्या पोलिसांसमोर आहे. मात्र, गेल्या महिनाभरात पोलिसांना बोठेच्या ठावठिकाणाबाबत एकही खरी खबर मिळू शकलेली नाही.
नजर न ठेवल्याने बेजार होण्याची वेळ
जरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे याची संशयास्पद हालचाच सुरू झाली होती. त्याच वेळी पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली असती तर त्याच्या शोधासाठी एव्हढे बेजार होण्याची वेळ आली नसती. बोठे काळ्या कारमधून जामखेडला पसार झाला, तो पुण्यात डॉ. निलेश शेळके याच्या संपर्कात आहे. अशीही चर्चा होती. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी तपासणी केली. मात्र, बोठे सापडलाच नाही.