बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:19 IST2021-01-17T04:19:10+5:302021-01-17T04:19:10+5:30
गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी बोठे याने जिल्हा न्यायालयात ७ डिसेंबर रोजी अर्ज केला होता. न्यायालयाने १६ डिसेंबर ...

बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी बोठे याने जिल्हा न्यायालयात ७ डिसेंबर रोजी अर्ज केला होता. न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर बोठे याने ॲड. संतोष जाधवर यांच्या माध्यमातून खंडपीठात ३१ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता १८ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र दीड महिन्यापासून फरार आहे. सर्वत्र शोध घेऊनही तो पोलिसांना सापडेना.
जरे यांच्या वकिलाची पोलीस संरक्षणाची मागणी
बाळ बोठे याच्याकडून अथवा त्याच्या हितचिंतकांकडून माझ्यावर दबाव अथवा धमकी देण्याची शक्यता असल्याने मला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी जरे कुटुंबीयांचे वकील ॲड. सचिन पटेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या निवेदनात पटेकर यांनी म्हटले आहे की, रेखा जरे हत्याकांडातील फिर्यादी सिंधूबाई वायकर यांच्यावतीने सरकार पक्षाला मद व्हावी, यासाठी माझे वकीलपत्र न्यायालयात सादर केले आहे. अशा परिस्थितीत बोठे याच्याकडून मला व माझ्या कुटुंबीयांना धमकविण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत तसेच बोठे याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मला शासनातर्फे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी पटेकर यांनी केली आहे.