आरोग्य कर्मचाऱ्यांचे रोहित पवार यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:46+5:302020-12-22T04:20:46+5:30
कर्जत : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार रोहित पवार यांना दिले. आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचे रोहित पवार यांना साकडे
कर्जत : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार रोहित पवार यांना दिले. आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी करण्यात आली.
कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेली कामे नियमित पूर्ण केली. मात्र, जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व आरोग्य सेवक यांचे विविध प्रश्न राज्य सरकार व जिल्ह परिषद यांच्याकडे प्रलंबित आहेत. येथील १५६ कर्मचाऱ्यांना स्थायीत्वाचा लाभ मिळावा, २९ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, २०१२ पासून आरोग्य पर्यवेक्षक यांना पदोन्नती दिली नाही, ती देण्यात यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, गेल्या पंधरा वर्षांपासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली आहे, ती प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर डिसले, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैलुमे, जिल्हा संघटक स्वप्निल शिंदे, अशोक लिंगडे, संदीप काळे, नितीन मोरे, संजय भैलुमे, भिकू पवार आदी उपस्थित होते.