आशा सेविकांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:26 IST2021-08-13T04:26:13+5:302021-08-13T04:26:13+5:30
केडगाव : कोरोना महामारीच्या काळात आशा सेविकांनी स्वत:च्या आरोग्याची तमा न बाळगता नागरिकांच्या ...

आशा सेविकांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची
केडगाव : कोरोना महामारीच्या काळात आशा सेविकांनी स्वत:च्या आरोग्याची तमा न बाळगता नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. घरोघरी जाऊन तपासणी, कोरोनाविषयी माहिती, सुरक्षिततेबाबत जागृती यासारखी कामे जीव धोक्यात घालत केली आहेत. त्यांना लोकांच्या बरे - वाईट बोलण्याच्या प्रसंगाचाही सामना करावा लागला. त्यामुळे आशा सेविकांच्या आरोग्य सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड यांनी दिली.
पंचायत समिती नगर व डॉन बास्को ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वाळकी (ता.नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आशा सेविकांना आरोग्य कीट वाटप करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, शिवसेना नेते संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, फादर जॉर्ज, माजी उपसभापती रवींद्र भापकर, तालुका उपप्रमुख जिवाजी लगड, डॉ. अनिल ससाणे, प्राचार्य शिंदे, पर्ववेक्षक सुनील कोठुळे, भाऊसाहेब तापकीर आदी उपस्थित होते.