मुख्याध्यापक चौकशीच्या फेऱ्यात अडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST2021-03-04T04:37:29+5:302021-03-04T04:37:29+5:30
गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असतात. मात्र एका पंचायत समितीचे सदस्याने केंद्रप्रमुखांना हाताशी धरून पारनेर, वडझिरे, वाडेगव्हाण, ...

मुख्याध्यापक चौकशीच्या फेऱ्यात अडकणार
गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असतात. मात्र एका पंचायत समितीचे सदस्याने केंद्रप्रमुखांना हाताशी धरून पारनेर, वडझिरे, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, देवीभोयरे, निघोज येथील मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन गणवेश आपण सांगू, त्या दुकानातून घ्यावे. असा आदेश दिला होता. या बैठकांना प्राथमिक शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध करताच शिक्षण खळबळ उडाली होती.
केंद्रप्रमुख यांना बेकायदेशीर बैठक प्रकरणी खुलासा मागवला आहे. दरम्यान अनेक मुख्याध्यापक यांनी त्या बेकायदेशीर बैठकीत शालेय गणवेश ची ऑर्डर दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. आता त्या दुकान दाराला शालेय गणवेशची ऑर्डर देणारे मुख्याध्यापक चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. पारनेर पंचायत समितीचे शिक्षण विभागाने याची माहिती जमा करणे सुरू केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ पातळी वरून याची गंभीर दखल घेतली आहे.
............
कुणाचाही दबाव घेऊ नये
पंचायत समितीचे सदस्याने घेतलेल्या बेकायदेशीर बैठक नंतर गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांची बैठक घेऊन शालेय गणवेश खरेदी करण्यासाठी कुणाचाही दबाव शिक्षक यांनी घेऊ नये. नियमाप्रमाणे खरेदी करावी, गटविकास अधिकारी किशोर माने यांनी अशा सूचना दिल्या.
.............
शेळके यांचे मौन
याबाबत सभापती गणेश शेळके यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असता त्यांनी मौन बाळगले. या विषयावर नंतर बोलू, असे त्यांनी सांगितले.