राज्य धनुर्विद्या संघटनेची धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:37+5:302021-08-13T04:25:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यातील जिल्हा संघटना मतदारांनी पुन्हा एकदा कौल ...

राज्य धनुर्विद्या संघटनेची धुरा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यातील जिल्हा संघटना मतदारांनी पुन्हा एकदा कौल देत राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड केली. तसेच भारतीय धनुर्विद्या महासंघाचे महासचिव प्रमोद चांदुरकर यांचीही राज्य संघटनेच्या सचिवपदी निवड केली आहे.
राज्य कार्यकारिणी सदस्य मतदानात ६० पैकी ६० मते घेत अहमदनगर जिल्हा धनुर्धारी संघटनेचे सचिव अभिजीत दळवी यांनी विजय मिळवला.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेची अमरावती येथील महेश भवन येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. चंद्रशेखर डोरले, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. दिलीप तिवारी यांनी तर निवडणुकीत निरीक्षक म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने क्रीडा उपसंचालक विजय संतान व भारतीय धनुर्विद्या महासंघाच्यावतीने महासंघाचे उपाध्यक्ष चेतन कावलीकर यांनी काम पहिले.
नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्षपदी ॲड. प्रशांत देशपांडे (अमरावती), सचिवपदी प्रमोद चांदुरकर (अमरावती), उपाध्यक्षपदी हरिदास रणदिवे (सोलापूर) व उदय नाईक (ठाणे), सहसचिवपदी सोनल बुंदेले (पिंपरी चिंचवड), कोषाध्यक्षपदी रंगराव साळुंके (हिंगोली), सदस्यपदी अभिजीत दळवी (अहमदनगर), लक्ष्मीकांत खीची (औरंगाबाद), प्रवीण गडदे (उस्मानाबाद), बाबासाहेब जाधव (सातारा), धनंजय वानखेडे (वाशिम), पूनम महात्मे (मुंबई) यांची वर्णी लागली.
..........
१२ अभिजीत दळवी