फादर स्टॅन स्वामींवर लादलेल्या आरोपातून त्यांना मुक्त करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:17+5:302021-07-12T04:14:17+5:30

भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, समाजासाठी नि:स्वार्थीपणे योगदान देणाऱ्यांसाठी नक्कीच हा विषय धोकादायक असून, एकूण समाजासाठी फार ...

He should be acquitted of the charges against Father Stan Swamy | फादर स्टॅन स्वामींवर लादलेल्या आरोपातून त्यांना मुक्त करावे

फादर स्टॅन स्वामींवर लादलेल्या आरोपातून त्यांना मुक्त करावे

भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, समाजासाठी नि:स्वार्थीपणे योगदान देणाऱ्यांसाठी नक्कीच हा विषय धोकादायक असून, एकूण समाजासाठी फार गंभीर व चिंताजनक आहे. परंतु देशात घडणाऱ्या या प्रकारच्या अमानवीय घटनांवर आपण व देशातील संविधानप्रेमी खासदार आणि इतर नेत्यांनी आवाज उठविणे अपेक्षित आहे. या विषयाला घेऊन केंद्र सरकारकडे आमच्यासह काही सामाजिक संस्था आंदोलनाद्वारे अशी मागणी करणार आहोत की, फादर स्टॅन स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून समाजसेवी वृत्तीवर जो अन्याय करण्यात आला. त्याचे समर्थन होणे शक्य नाही. म्हणूनच फादर स्टॅन स्वामी यांना निर्दोष घोषित करावे तसेच त्यांच्या सोबत व त्या एकाच गुन्ह्यात अडकवलेल्या इतरांचीही निर्दोष सुटका करावी. समविचारी नागरिकांनी या आंदोलन वजा प्रचार मोहिमेत सहभागी होऊन फादर स्टॅन स्वामी व त्यांच्यासोबतच लोकांवर झालेल्या अन्याय विरोधात आवाज उठवावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. हीच फादर स्टॅन स्वामी यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

Web Title: He should be acquitted of the charges against Father Stan Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.