‘तो’ एका पायावर चालवतोय संसाराचा गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:13+5:302021-03-22T04:20:13+5:30

कर्जत : दोन हात व एका पायाने दिव्यांग असूनही कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील नीलेश बापू हगारे हा युवक ...

‘He’ is driving the car of the world on one foot | ‘तो’ एका पायावर चालवतोय संसाराचा गाडा

‘तो’ एका पायावर चालवतोय संसाराचा गाडा

कर्जत : दोन हात व एका पायाने दिव्यांग असूनही कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील नीलेश बापू हगारे हा युवक फोटोग्राफी करून संसाराचा गाडा यशस्वीपणे चालवत आहे. युवा पिढीसाठी नीलेश हा आयडाॅल ठरला आहे.

दिवसेंदिवस माणसांमध्ये संघर्ष करण्याची सवय उरली नाही. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. संसाराचा गाडा चालविताना दोन हात, दोन पाय असणारी माणसे आत्महत्येचा पर्याय निवडतात. मात्र चिंचोली रमजान येथील नीलेश हगारे या युवकाचा जन्मच संघर्ष करण्यासाठी झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नीलेश हा जन्मत:च दोन हात व एका पायाने दिव्यांग आहे. आई-वडिलांना त्याच्या भविष्याची चिंता सतावत होती. मात्र त्याने बी.ए.ची पदवी घेतली. शिक्षण घेत असतानाच त्याने पारनेर तालुक्यातील जामगाव येथील त्याचे भाऊसाहेब पवार (दाजी) यांच्याकडे फोटोग्राफीचे धडे गिरविले. त्यांनी नीलेशला फोटोग्राफीसाठी कॅमेरा घेऊन दिला. मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

सुरुवातीला गावात त्याने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. येथे जम बसला. त्यानंतर मांदळी येथे गाळा भाड्याने घेऊन फोटो स्टुडिओ थाटला. तेव्हापासून लग्नसमारंभ, वाढदिवस, लहान-मोठे कार्यक्रम यांच्या तो फोटोच्या ऑर्डर घेतो. तो एका पायावर उभा राहून फोटो काढतो. कॉम्प्युटरचेही ज्ञान त्याने आत्मसात केले.

त्याची चिकाटी, जिद्द व व्यवसायात केलेली प्रगती पाहून त्याच्या नातेवाइकांनी २०१८ मध्ये नीलेशचे दोनाचे चार हात केले. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही. तो सायकल व मोटारसायकल सुरळीतपणे चालवितो. त्याने केलेल्या संघर्षाची दखल घेऊन कर्जत येथील मेट्रो परिवाराने त्याचा सन्मान केला. यावेळी मेट्रोचे अध्यक्ष राहुल सोनमाळी, सामाजिक कार्यकर्ते सचिन पोटरे, नगरसेवक सचिन सोनमाळी, डॉ. प्रकाश भंडारी, आदी उपस्थित होते.

--

२१ कर्जत

Web Title: ‘He’ is driving the car of the world on one foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.