घरफोडी करून सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:21 IST2021-05-09T04:21:03+5:302021-05-09T04:21:03+5:30

.......... टेम्पो चोरला अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील अष्टवाडा येथून चोरट्यांनी टेम्पो चोरून नेला. दिनांक ३ ते ४ मे दरम्यान ...

He burglarized the house and stole Rs | घरफोडी करून सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरला

घरफोडी करून सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरला

..........

टेम्पो चोरला

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील अष्टवाडा येथून चोरट्यांनी टेम्पो चोरून नेला. दिनांक ३ ते ४ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अप्पासाहेब अशोक बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक बडे पुढील तपास करत आहेत.

........

दुचाकीची चोरी

अहमदनगर : केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्थेसमोरून चोरट्यांनी २० हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली. दिनांक ६ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तुळशीराम गणपत घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक पंचमुखी हे पुढील तपास करत आहेत.

.........

पंधरा हजार रुपये किमतीचा मेंढा चोरला

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येथे मेंढ्याच्या खंडातून चोरट्याने १५ हजार रुपयांचा एक मेंढा चोरून नेला. दिनांक ७ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आबासाहेब सखाराम कोळपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल बारवकर हे पुढील तपास करत आहेत.

...........

Web Title: He burglarized the house and stole Rs