हिवरेबाजारने केलेले ग्रामविकासाचे काम अदभुत : डॉ.अंजली तेंडुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 18:33 IST2018-06-02T18:33:08+5:302018-06-02T18:33:59+5:30
आदर्शगाव हिवरे बाजारने पाणी नियोजनातून केलेली कृषीकांती देशाला मार्गदर्शक ठरेल असे मत डॉ.अंजली सचिन तेंडुलकर यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत व्यक्त केली. तेंडुलकर यांनी नुकतीच हिवरे बाजारला भेट देवून गेली २८ वर्षे लोकसभागातून झालेल्या विविध कामांची पहाणी करून माहिती घेतली.

हिवरेबाजारने केलेले ग्रामविकासाचे काम अदभुत : डॉ.अंजली तेंडुलकर
अहमदनगर : आदर्शगाव हिवरे बाजारने पाणी नियोजनातून केलेली कृषीकांती देशाला मार्गदर्शक ठरेल असे मत डॉ.अंजली सचिन तेंडुलकर यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत व्यक्त केली. तेंडुलकर यांनी नुकतीच हिवरे बाजारला भेट देवून गेली २८ वर्षे लोकसभागातून झालेल्या विविध कामांची पहाणी करून माहिती घेतली.
तेंडुलकर म्हणाल्या, हिवरे बाजारने पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले ग्रामविकासाचे काम अदभूत आहे. प्रत्येक शेतक-याच्या बांधापर्यंत योजनांचे जाळे या गावाने निर्माण केले आहे. ठराविक काळासाठी व विशिष्ठ कामासाठी गावाला एकत्र आणणे व काम करणे कदाचित सोपे आहे परंतु संघटनात्मक कामातील सातत्य हे या गावाचे खरे वैशिष्ठ्य आहे. सचिन तेंडुलकर यांनी दत्तक घेतलेल्या उस्मानाबाद जिल्यातील डोणजे गावात सुध्दा पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांना केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले असून तेथे काम करण्यास वेगळी दिशा मिळाली आहे. तेंडुलकर फौंडेशन वतीने करंजी (ता.पाथर्डी) व कोकणात काही गावात ग्रामविकासाचे काम चालू आहे. त्यासाठी पोपटराव पवार यांच्या अनुभवाचा फायदा घेवून काम करण्यास निश्चित आनंद होईल.गावागावातील मतभेद दूर करण्यासाठी व संघटन मजबूत करून इतर गावांमध्ये पोपटरावांच्या मदतीने प्रत्येक गोष्ट शेतक-यांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
कालच्या भेटीत डॉ.अंजली तेंडूलकर समवेत मृण्मय मुखर्जी व झोया कजरी उपस्थित होते. पोपटराव पवार यांनी विविध विकास कामांची माहिती देताना पुढील काळात विकासात्मक कामात सहकार्य करण्याचे सांगितले.