मर्चंटस बँकेच्यावतीने हस्तीमलजी मुनोत यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:48+5:302021-07-20T04:16:48+5:30
यावेळी चेअरमन अनिल पोखरणा, व्हाईस चेअरमन सुभाष बायड, संचालक, किशोर गांधी, अजय मुथा, आदेश चंगेडिया, संजय बोरा, मोहन बरमेचा, ...

मर्चंटस बँकेच्यावतीने हस्तीमलजी मुनोत यांचा सत्कार
यावेळी चेअरमन अनिल पोखरणा, व्हाईस चेअरमन सुभाष बायड, संचालक, किशोर गांधी, अजय मुथा, आदेश चंगेडिया, संजय बोरा, मोहन बरमेचा, कमलेश भंडारी, मीनाताई मुनोत, अमित मुथा, संजीव गांधी, विजय कोथिंबीरे, सुभाष भांड, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी, अधिकारी सुरेश फिरोदिया आदी उपस्थित होते.
यावेळी पोखरणा म्हणाले की, सहकार क्षेत्रात काम करताना मालक नाही तर विश्वस्त भावनेने काम करणे महत्त्वाचे असते. ही शिकवण स्वतः आचरणात आणत इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे व्रत हस्तीमलजी मुनोत यांनी कायम जपले आहे. मर्चंट बँकेसाठी ते आधारवड आहेत. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच ऊर्जा देणारे असते.
सत्काराला उत्तर देताना हस्तीमल मुनोत म्हणाले की, मर्चंटस बँकेची स्थापना करताना उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देत समाजाचा, शहराचा विकास हे उद्दिष्ट ठेवले होते. ते साध्य करण्यात यश मिळाले आहे. मर्चंटस बँकेने नेहमीच भविष्याचा वेध घेऊन कारभार केला आहे. तीच परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न राहील. सुभाष बायड यांनी आभार मानले. (वा. प्र.)
---------------
फोटो-१९ मर्चंट बँक
मर्चंटस बँकेचे संस्थापक व ज्येष्ठ संचालक हस्तिमल मुनोत यांचा सत्कार करताना अनिल पोखरणा व बँकेचे संचालक मंडळ.