माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:27+5:302021-08-14T04:26:27+5:30
जामखेड : तालुक्यातील हळगाव - जवळा रस्त्यावरील पुराणे वस्ती येथील ३६ वर्षीय महिलेचा माहेराहून घर खर्च, शेती कामासाठी पैसे ...

माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
जामखेड : तालुक्यातील हळगाव - जवळा रस्त्यावरील पुराणे वस्ती येथील ३६ वर्षीय महिलेचा माहेराहून घर खर्च, शेती कामासाठी पैसे आणण्यासाठी वारंवार मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे, याबाबतच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पती संदीप भीमराज पुराणे, सासू गजराबाई भिवराज पुराणे, सासरा भिवराज अर्जुन पुराणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
१३ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास विवाहिता जनावरांना चारा टाकत होती. त्यावेळी तुला जनावरांना चारा कोणी टाकायला सांगितला. जनावरांचा चारा काय तू आई-वडिलांच्या घरून आणला काय? तू तुझ्या वडिलांकडून घरखर्चासाठी पैसे का आणत नाहीस? असे म्हणत सासूने विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सासऱ्यानेही मारहाण केली. पतीनेही शिवीगाळ करून माहेराहून पैसे आणले नाहीस तर तुला जीवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम लोखंडे करीत आहेत.