सबजेलमध्ये हनुमान चालीसा
By Admin | Updated: October 18, 2014 23:46 IST2014-10-18T23:46:44+5:302014-10-18T23:46:44+5:30
अहमदनगर : जिल्हा कारागृहात हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते.

सबजेलमध्ये हनुमान चालीसा
अहमदनगर : ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ कारागृहाच्या या ब्रीद वाक्यानुसार बंदी जणांमध्ये सदाचार, सदभाव वृध्दींगत व्हावा, या हेतूने शहरातील श्रीराम मंदिर येथील हनुमान सत्संग मंडळाच्यावतीने जिल्हा कारागृहात हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यसनाधिन झालेला युवक वर्ग आणि समाजात बिघडलेले मानसिक आरोग्य या पार्श्वभूमीवर शरीर संपदा आणि सदाचारासंबंधी जनजागरण करण्यासाठी मंडळाचा हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम सुरू आहे. सहा वर्षापासून मंडळाच्यावतीने हनुमान जयंती उत्सवादरम्यान ४० दिवस विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येतो. त्यातील एक कार्यक्रम नुकताच कारागृहातील बंदी बांधवांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अधीक्षक दत्तात्रय गावडे, रक्षक आणि २५० बंदीवान उपस्थित होते.
(प्रतिनिधी)