तांत्रिक दोषामुळे हस्तलिखित

By Admin | Updated: December 15, 2015 23:15 IST2015-12-15T23:04:56+5:302015-12-15T23:15:51+5:30

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व्हर सिस्टीममध्ये झालेला दोष मंगळवारीही कायम राहिल्याने हस्तलिखित उमेदवारी अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली.

Handwritten due to technical dilemma | तांत्रिक दोषामुळे हस्तलिखित

तांत्रिक दोषामुळे हस्तलिखित

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज सादर करण्याबाबत सर्व्हर सिस्टीममध्ये झालेला दोष मंगळवारीही कायम राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये हस्तलिखित (आॅफलाईन) उमेदवारी अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली. मंगळवारी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची तसेच २६० उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातून देण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या सर्व्हर सिस्टीममधील विविध दोषामुळे सोमवारी संगणकावर दाखल झालेले काही उमेदवारी अर्ज तपासण्यात आले व त्यानंतर सिस्टीममधील त्रुटीबाबत राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना याबाबत लेखी पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीमती ज्योती कावरे यांनी माहिती दिली. मंगळवारी दुपारपर्यंत हा गोंधळ सुरू राहिल्याने विविध पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडून याबाबत तातडीने पुढील कार्यवाही करण्याची मागणी नोंदविली.
दरम्यान, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कावरे यांनी राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार हस्तलिखित (आॅफलाईन) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना इच्छुकांना देण्यात आल्या. त्यानंतर निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्जाचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मंगळवारी २६० अर्जांचे वाटप झाल्याची माहिती मंडळाधिकारी नितीन बनसोडे यांनी दिली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Handwritten due to technical dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.