ाहाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:55+5:302021-06-22T04:14:55+5:30
राहाता जागतिक योग दिनाचे औचित्य साधत राहात राहाता : जागतिक योग दिनाचे औचित्य साधत राहाता येथील साई योग फाउंडेशनने ...

ाहाता
राहाता
जागतिक योग दिनाचे औचित्य साधत राहात
राहाता
: जागतिक योग दिनाचे औचित्य साधत राहाता येथील साई योग फाउंडेशनने डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे आणि योग मार्गदर्शक सुरेश भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सावता महाराज मंदिर येथे एक दिवसीय योग शिबिर घेतले. शिबिराचे उद्घाटन राहाता तालुका गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
योग साधकांना भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रशस्तिपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
समारोपप्रसंगी गणेश साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, रघुनाथ बोठे, नगरसेविका अनुराधा तुपे, नगरसेवक विजय सदाफळ, राहता तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश बावके, राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे, बाळासाहेब सोनवणे, राजेंद्र वाबळे, किरण वाबळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय उबाळे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अशोक बोराडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब गाडेकर व दशरथ तुपे यांनी केले. अरविंद बावके यांनी आभार मानले. शिबिरासाठी बबलू फटांगरे, विनोद गाडेकर, राजू वायकर, भाऊसाहेब बनकर, संजय वाघमारे, दीपक दंडवते, उमेश लुटे, पांडुरंग गायकवाड, दीपक गाडेकर यांच्यासह साई योग फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.