घार नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

By Admin | Updated: May 24, 2016 23:39 IST2016-05-24T23:34:19+5:302016-05-24T23:39:29+5:30

अहमदनगर: सर्जेपुरा, तोफखाना भागातून जाणाऱ्या घार नाल्यावरील अतिक्रमणावर महापालिकेने मंगळवारी हातोडा टाकला. दिवसभर सुरू असलेल्या मोहिमेत ७५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले.

Hammer on encroachment on khar nallah | घार नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

घार नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

अहमदनगर: सर्जेपुरा, तोफखाना भागातून जाणाऱ्या घार नाल्यावरील अतिक्रमणावर महापालिकेने मंगळवारी हातोडा टाकला. दिवसभर सुरू असलेल्या मोहिमेत ७५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले. बुधवारी राहिलेले २७ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त केले जाणार आहे. सुमारे ७० लाख रुपये खर्च करून या नाल्याचे नूतनीकरण सुरू असून अतिक्रमणे नूतनीकरणास अडथळा ठरत होती.
मंगलगेट, एस.टी वर्कशॉप, प्रियदर्शनी कॉम्पलेक्स, बागडपट्टी, पोलीस मुख्यालय भागातील पावसाचे पाणी घार नाल्यातून वाहत जाऊन दिल्लीगेट येथून ते सीना नदीला मिळते. तत्कालीन जिल्हाधिकारी विमलेंद्र शरण यांनी बाजारपेठेतील मोचीगल्ली, कापडबाजारातील अतिक्रमणे हटविली होती. त्यात विस्थापित झालेल्यांचे तात्पुरते पुनर्वसन घार नाल्याभोवती केले होते. मात्र विस्थापितांच्या बरोबरीने इतरही लोकांनी या जागेवर अतिक्रमण करून व्यावसायिक गाळे बांधले. त्यामुळे नाला कोंडला गेला. पावसाचे पाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात शिरू लागले. नगरसेवक अरीफ शेख यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे ७० लाख रुपयांचा निधी घार नाला नूतनीकरणासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिला. त्याचे काम सुरू झाले. मात्र नाल्यावरील अतिक्रमणामुळे हे काम थांबले होते.
अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली पथक संबोधी शाळेजवळ पोहचले. तेथून अतिक्रमणे पाडण्यास सुरूवात केली. संबोधी शाळा ते नवरंग व्यायामशाळेदरम्यान असलेल्या २८ आणि नवरंग व्यायामशाळा ते सारडा माध्यमिक विद्यालयापर्यंत असलेल्या ४७ व्यावसायिक गाळ्यावर हतोडा टाकत ते जमीनदोस्त करण्यात आले. बुधवारी सारडा माध्यमिक विद्यालयापासून पुढील २७ व्यावसायिक गाळे पाडले जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hammer on encroachment on khar nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.