शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण थोपवून जागा पक्क्या करा : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:23 IST

भाजपमध्ये घेता का? असे म्हणणाऱ्यांची पक्षात रांग लागली आहे. त्यामुळे आपापले खुटे हलवून पक्के करा.

अहमदनगर : भाजपमध्ये घेता का? असे म्हणणाऱ्यांची पक्षात रांग लागली आहे. त्यामुळे आपापले खुटे हलवून पक्के करा. आपलेच गडी जिंकले पाहिजेत. पक्षामधील अतिक्रमण थांबवा आणि जिल्ह्यात १२-० अशा पद्धतीने विधानसभा निवडणूक जिंका, असा सल्ला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला.भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शनिवारी नगरमध्ये प्रारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, पक्षाचे प्रभारी बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, विरोधकांची भंबेरी उडाली आहे. शेवटच्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही विरोधकांनी नांगी टाकली. विरोधी पक्षच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे यश आजमावण्याची पुन्हा संधी आहे, असे सांगून जिल्हात कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी करून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले.पत्रकारांशी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, पक्षातले कार्यकर्ते ढिले पडणार नाहीत, यासाठी त्यांना खुटा पक्का करण्याचा सल्ला दिला. पक्षाला अजिबात धोका नाही. जागा दाबून धरण्यात गर्भित इशारा आहे. लोकसभेत सगळीकडे मताधिक्य मिळाले. त्याचा वेग वाढविता आला पाहिजे. राज्यात विरोधी पक्षनेता होण्यासाठी ओढाताण आहे. विरोधी पक्ष नेताच आम्ही पक्षात आणला. केंद्रातही काँग्रेसला विरोधी पक्ष नेता मागेही मिळाला नाही आणि आताही नाही. विखे पक्षात आल्याने सर्व काही सोईस्कर होईल.छावण्या सुरूच राहतीलपाऊस लांबला आहे. एक आॅगस्टपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. बंद केलेल्या छावण्या पूर्ववत चालू करण्याचा शासनानेच आदेश दिला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातही वेगळा आदेश नाही. ज्या चालकांना छावण्या चालवायच्या नाहीत, अशा ठिकाणी शासन पर्यायी व्यवस्था करेल. छावणी चालकांची बिले देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. लोकांची मागणी असेल आणि छावणी चालकांची इच्छा असो की नसो, तिथे छावणी सुरूच राहील. लोकांची मागणी असेल तर टँकरही बंद केले जाणार नाहीत.विखे असिस्टंट पालकमंत्रीनव्याने झालेल्या तीन मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री दिले नाही, याकडे लक्ष वेधले असता प्रा. राम शिंदे म्हणाले, पाच वर्षे पदावर राहिलेला मी पहिला पालकमंत्री आहे. नव्याने झालेले मंत्री (विखे) हे असिस्टंट पालकमंत्री राहतील. शासनाच्या धोरणानुसारच असे पद आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे