भंडारदरा परिसरात वादळी वा-यासह गारांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:32 IST2020-05-06T16:32:25+5:302020-05-06T16:32:42+5:30
भंडारदरा व परिसरात मंगळवारी (दि.५ मे) संध्याकाळी एक तास वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. या पावसात गारा देखील पडल्या.

भंडारदरा परिसरात वादळी वा-यासह गारांचा पाऊस
भंडारदरा : भंडारदरा व परिसरात मंगळवारी (दि.५ मे) संध्याकाळी एक तास वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. या पावसात गारा देखील पडल्या.
मंगळवारी सायंकाळे पावणे सहा वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत वादळ, वाºयासह गारांचा पाऊस झाला. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. घरकुल योजनेअंतर्गत अनेकाच्या घरकुलाचे काम अपूर्ण आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरकुलाचे पत्रे, अँगल, सिमेंट, विटा व इतस सामान मिळत नव्हते. त्यामुळे घरकुलाची कामे खोंळबली आहेत. काही कामे अर्धवट आहेत. वादळामुळे या घरांचे पत्रे व इतर साहित्य अनेक ठिकाणी उडून गेली. यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.