हवालदार मारुती तरटे चंदिगडमध्ये शहिद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:04 IST2018-09-22T17:04:36+5:302018-09-22T17:04:40+5:30
पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील मठवस्तीवरील भारतीय सैन्य दलातील हवालदार मारुती गंगाराम तरटे(वय : ४५) यांचे चंदिगड येथे शहिद झाले.

हवालदार मारुती तरटे चंदिगडमध्ये शहिद
पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील मठवस्तीवरील भारतीय सैन्य दलातील हवालदार मारुती गंगाराम तरटे(वय : ४५) यांचे चंदिगड येथे शहिद झाले. हिमाचल प्रदेशमधील पालमपूर येथे सिग्नल कंपनीमध्ये युनिट -३९ अंतर्गत ते देशसेवेचे कर्तव्य बजावत होते.
हवालदार मारुती तरटे हे १९९६ साली भारतीय सैन्यदलातील सिग्नल कंपनीत भरती झाले. त्यानंतर त्यांनी देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावले. आतापर्यत त्यांची तेवीस वर्षे देशसेवा झाली. तीन महीन्यानंतर ते सेवानिवृत्त होणार होते. हवालदार तरटे यांच्या निधनामुळे पळवे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील, एक भाऊ, तीन बहीणी असा परिवार आहे. पळवे खुर्द या ठिकाणी रात्री उशीरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.