महापालिकेच्या नळातून गटारीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:45+5:302021-07-17T04:17:45+5:30
दूषित पाणीपुरवठ्याबाबत मुळे यांनी ९ जुलैला पाणीपुरवठा विभागात निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, गेल्या पंधरा दिवसांपासून ...

महापालिकेच्या नळातून गटारीचे पाणी
दूषित पाणीपुरवठ्याबाबत मुळे यांनी ९ जुलैला पाणीपुरवठा विभागात निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेच्या नळातून केवळ पाच वेळा पाणी आले आहे. हे पाणी दूषित स्वरुपाचे आहे. या दूषित पाण्यामुळे मी स्वत: आजारी पडलो आहे. कमीअधिक स्वरुपात संपूर्ण शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात विविध भागात येणाऱ्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून घ्यावेत, अशी मागणी मुळे यांनी केली होती. त्यानंतर मुळे यांनी स्वखर्चाने आगरकरमळा येथील महापालिकेच्या नळातून आलेल्या पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले. याचा १४ जुलैला अहवाल प्राप्त झाला असून, पाणी पिण्यास अयाेग्य असल्याचे त्यात नमूद आहे. यावरून शहरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
नगर शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. मनपाच्या स्टेशन रोड भागातील नळाच्या पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पदर खर्चाने तपासणीसाठी दिला होता. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा शेरा या अहवालात आला आहे. हे पाणी तपासणीस देण्यापूर्वी मी मनपाला नोटीस दिली होती. दूषित पाण्याबाबत आयुक्तांसह सर्व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील पाणी आणि रस्त्यांची तातडीने सुधारणा करावी, अन्यथा अर्ज, विनंत्या न करता संंबंधितांना थेट व्यक्तिगत प्रतिवादी करून गुन्हे दाखल करून न्यायालयात दाद मागितली जाईल.
- सुहास मुळे, अध्यक्ष जागरूक नागरिक मंच
सोबत :