गुरुकुल समिती संघटना नव्हे... कुटुंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:16+5:302021-08-14T04:25:16+5:30
मला तो दिवस आजही आठवतो. गुरुकुल समितीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १९ लाखांची मदत केली. तेव्हा अनेक स्त्रियांच्या डोळ्यांत अश्रू ...

गुरुकुल समिती संघटना नव्हे... कुटुंब !
मला तो दिवस आजही आठवतो. गुरुकुल समितीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १९ लाखांची मदत केली. तेव्हा अनेक स्त्रियांच्या डोळ्यांत अश्रू होते. मिळालेली आर्थिक रक्कम त्यांना आयुष्यभर पुरणार नव्हती. पण, मोडून पडलेले आयुष्य उभे करण्यास ही मदत पुरेशी ठरणार होती. असे अनेक प्रसंग आहेत. गुरुकुल समितीने गरजू समाजघटकांना आधार देण्याचे शेकडो प्रसंग आहेत. शेतकऱ्यांच्या ६५ कुटुंबीयांना ही मदत केल्यानंतर ७० कुटुंबीयांना प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते किराणाकिट देण्यात आले. गरीब मुलांच्या पालकांना दिवाळीत जे.डी. खानदेशे यांच्या हस्ते दिवाळीसाठी किराणा देण्यात आला. कै. बाबा आमटे यांच्या आनंदवनला एक लाख रुपयांची मदत, अपघातात मरण पावलेल्या राहुरी येथील शिक्षिकेच्या कुटुंबीयांना ५० हजार, कोरोनाच्या बिकट काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाच ऑक्सिजन कन्स्ट्रेक्टर, गुरुकुल दत्तक पालक योजनेत पाथर्डी येथील मुलींना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल अशी गुरुकुलच्या सामाजिक कामांची व मदतीची यादी न संपणारी आहे. बँकेत सत्ता नसतानाही फक्त सभासद बंधूभगिनींच्या विश्वासावर लाखो रुपयांची मदत गरजूंना गुरुकुलने दिली.
राज्यात सर्वात प्रामाणिक असलेल्या प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमाने शिक्षकांची वैयक्तिक व सामूहिक कामे मार्गी लावली जातात. ड्रेसकोडसारखा गुणवत्तेशी संबंध नसलेला विषय असेल, पदोन्नती ते पदावनती, फंड, मेडिकल बिले, बदल्या असे कितीतरी विषय प्रशासनाशी चर्चा करून सोडविले गेले आहेत. म्हणूनच तालुक्यापासून जिल्हा ते राज्यापर्यंत शिक्षकांचा समिती व गुरुकुलवर अतूट विश्वास आहे.
...................................
असे नेतृत्व होणे नाही
साहित्यक्षेत्रात आपल्या प्रतिभेने व प्रभावी वक्तृत्वाने शिक्षकांच्या मनावर राज्य करणारे डॉ. संजय कळमकरांसारखे नेतृत्व समिती-गुरुकुलला लाभले आहे. कुठल्याही हॉस्पिटलला बिल कमी करण्यापासून शिक्षकांच्या मुलांना हव्या त्या संस्थेत प्रवेश मिळतो, तो फक्त या गुणी नेतृत्वामुळे. त्यांना कणखर नेते रा.या. औटी, संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, वृषाली कडलग, राजेंद्र ठाणगे, सुनील बनोटे, इमाम सय्यद अशा अनेक नेत्यांची मोलाची साथ आहे. त्यामुळेच शिक्षकांच्या प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, अगदी कौटुंबिक अडचणी सोडविण्यातही समिती गुरुकुलचा यशस्वी सहभाग असतो.
...............
महिलांचा सन्मान, वैचारिक मेजवानी
गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा वृषाली कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षिकांना दरवर्षी गुरुकुल नारीशक्ती पुरस्कार दिला जातो. हा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार होतो. वितरणासाठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती बोलवल्या जातात. आतापर्यंत प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, इंद्रजित भालेराव, प्रशांत मोरे, भरत दौंडकर, संजीवनी तडेगावकर, मोहिनीराज गटणे या मान्यवरांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे. हा पुरस्कार सोहळा म्हणजे महिला व शिक्षकांसाठी एक वैचारिक व सांस्कृतिक मेजवानीच असते.
.................
उज्ज्वल निकम यांची उपस्थिती
शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राजेंद्र पट्टेकर अध्यक्ष असलेल्या गुरुकुल सांस्कृतिक समितीच्या माध्यमाने गुरुकुल प्रतिभा साहित्य संमेलन घेतले जाते. पहिल्या संमेलनास थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे उपस्थित होते. तर, दुसऱ्या भव्य संमेलनात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी उपस्थित राहून कलावंत शिक्षकांचा गौरव केला. गुरुकुलच्या माध्यमातून आतापर्यंत छत्तीस शिक्षकांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे.
.............
महापुराचा मोठा फटका बसलेल्या हळगाव (ता. वाळवा, जि.सांगली) या गावातील सर्व कुटुंबांसाठी गुरुकुल समितीने खाद्यतेल व पाण्याच्या बिसलरी पाठवल्या. शासकीय मदतीच्या आधी मदत पाठवल्याबद्दल हळगावचे सरपंच सचिन सावंत यांनी गुरुकुलप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्या गावातील सर्व मुलांच्या शैक्षणिक गरजा गुरुकुल भागवणार आहे. शिक्षकांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच गुरुकुल समितीचे शिलेदार आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने कायम काम करत असतात.
-अशोक कानडे
संपर्कप्रमुख, गुरुकुल-शिक्षक समिती