‘गुरुजींची कथा’ विश्व साहित्य संमेलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:15+5:302021-01-23T04:21:15+5:30
अहमदनगर : २८ ते ३१ जानेवरीदरम्यान ऑनलाइन होत असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात नगरचे साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या ...

‘गुरुजींची कथा’ विश्व साहित्य संमेलनात
अहमदनगर : २८ ते ३१ जानेवरीदरम्यान ऑनलाइन होत असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात नगरचे साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या ‘गुरुजी काहीतरी हरवले आहे’ या कथेचे सादरीकरण होणार आहे. २८ जानेवारी रोजी कळमकर यांच्या कथेचे सादरीकरण होणार आहे.
या महासंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन असून जेष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर अध्यक्षपद भूषवणार आहेत. मराठी माणसाला राष्ट्रीय व वैश्विक पातळीवर सामर्थ्यवान बनवणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. या संमेलनात ३५ देश, २५ राज्ये, १५० संस्था, ५०० वाचनालये व १२०० महाविद्यालये सहभागी होणार आहेत. या महासंमेलानातून साहित्यिकांना जगातील दहा लाख मराठी माणसांसमोर अभिव्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. संमेलनात कथन करण्यासाठी निवड झालेल्या ‘गुरुजी काहीतरी हरवले आहे’ या कथेविषयी बोलताना कळमकर म्हणाले, कथेची मागणी झाली तेव्हा मी आवर्जून माझी ही कथा कथन करण्यासाठी निवडली. ही कथा पूर्वी व आत्ताच्या शिक्षणव्यवस्थेतील बदल व शिक्षकाच्या बदलत गेलेल्या प्रतिमेविषयी भाष्य करते. गुरुजी ग्रामीण भागात काम करत असले तरी त्यांच्यात वैश्विक विषय होण्याची ताकद आहे. या कथेच्या निमित्ताने जगातील मराठी माणसांच्या शाळेतील आठवणी जाग्या होतील व त्यांना त्यांचे जुने गुरुजी आठवतील याची मला खात्री आहे.’
२१ संजय कळमकर