शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपौर्णिमेनिमित्त साईनगरीत भाविकांची गर्दी, व्हीआयपी दर्शन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 11:38 IST

शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत.

ठळक मुद्दे शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असल्याने सशुल्क दर्शन व व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले.गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. 

शिर्डी - शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. मंगळवारी (16 जुलै) उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असल्याने सशुल्क दर्शन व व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.

साई संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, डॉक्टर आकाश किसवे संस्थांचे सुरक्षा प्रमुख गंगावणे व शिर्डी व मंदिर सुरक्षेचे पोलीस गर्दी व्यवस्थापनासाठी परिश्रम घेत आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. 

शिर्डीत साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला गुरूपौर्णिमा आनंदाने, मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो आहे. तीन दिवस हा उत्सव शिर्डीत सुरू असतो. मंगळवारी सकाळी बाबांच्या काकड आरतीने उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. साईबाबांच्या पादूका आणि फोटोची मिरवणूक आज काकड आरतीनंतर निघाली. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण मानवतेला प्रेरणा देणारा आहे. शिर्डीत सर्वधर्मसमभावाचं अद्भुत स्वरुप पाहायला मिळतं. सर्व पंथांचे लोक साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात.

साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमली असून अतिशय भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. हजारो भाविक आपल्या गुरू चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल होत आहेत. साईसंस्थानाकडूनही भक्तांच्या सुविधेसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था,  भोजन, प्रसाद तसेच सुरक्षेच्या काळजीसह दर्शनासाठी उत्तम व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अमेरिका येथील एका साईभक्ताच्या देणगीतून साईमंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. तर मुंबई येथील द्वारकामाई भक्त मंडळाने साई मंदिर आणि परीसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर दरवर्षी रात्रभर उघडे ठेवण्यात येते. मात्र आज चंद्रग्रहण असल्याने रात्री साईबाबांची आरती झाल्यानंतर साईमंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे दरवर्षी मध्यरात्री दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आज दिवसभरातच बाबांचे दर्शन घ्यावे लागणार आहे. 

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डीGuru Purnimaगुरु पौर्णिमा