गुरु अर्जुन देवजी यांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:31+5:302021-06-16T04:28:31+5:30

श्रीरामपूर : शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहीद दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी पंजाबी व शीख सिंधी समाजाच्या वतीने ...

Of Guru Arjun Devji | गुरु अर्जुन देवजी यांच्या

गुरु अर्जुन देवजी यांच्या

श्रीरामपूर : शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहीद दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी पंजाबी व शीख सिंधी समाजाच्या वतीने लंगर प्रसाद व छबिल सरबत वाटप करण्यात आला. अन्नदान करून ४१० वा शहीद दिवस साजरा करण्यात आला.

शहीद दिनानिमित्त पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप व गयानी अनोखसिंगजी मस्कीन यांच्या हस्ते लंगर प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, नगरसेवक राजेश अलघ, माजी उपनगराध्यक्ष राजन चुग, भगवान सिंग बतरा, बिटासेठ भटियानी, रॉकी नागपाल, चंदन कुमार, अप्पू बत्रा, विकी कथुरिया, नीरज त्रिपाठी, जसवंतसिंग गुरुवाडा, सुखमितसिंग गुरुवाडा, सोनू चूग, बलविंदर बतरा,सावन सिंग, टिकूजी बेडेकर उपस्थित होते.

-------

फोटो ओळी : शहीद दिन

शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहीद दिनानिमित्त शहरात लंगर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

---------------

Web Title: Of Guru Arjun Devji