गुंडेगाव शाळेची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:49+5:302021-07-20T04:16:49+5:30
केडगाव : शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून (१९ जुलै) गुंडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलचे इयत्ता ८ ते १० ...

गुंडेगाव शाळेची घंटा वाजली
केडगाव : शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून (१९ जुलै) गुंडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलचे इयत्ता ८ ते १० पर्यंत शाळांचे दरवाजे उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून, शाळेच्या खोल्या निर्जंतुकीकरण करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात १७५ पैकी ९० विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोनामुळे पालकांमध्ये अद्याप संभ्रम असल्याने शाळेत पाठविण्यासाठी बहुतांश पालकांनी नकार दर्शविला आहे. शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी मुलांना शाळेत पाठविण्यास पालक फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे सोमवारी शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाची तपासणी करूनच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहे. शाळेच्या मुख्य दरवाजावर सॅनिटायझर, थर्मल गन ठेवण्यात आले आहे. तसेच मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांचीही तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळानंतर शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत असली तरी येत्या काही दिवसात शंभर टक्के उपस्थिती दिसेल, असे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पी. डी. नेहुल यांनी सांगितले. तसेच शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे.
शाळेचा परिसर आणि वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरणही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील ग्राम सुरक्षा समितीने प्रत्यक्षात पाहणी केली असून यावेळी शिक्षक परशुराम साबळे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ, सतीश चौधरी, संतोष सकट, पत्रकार संजय भापकर, विद्यार्थी पालक प्रमोद पवार, संतोष जाधव, रामकृष्ण कुताळ आदी उपस्थित होते.
190721\img-20210719-wa0204.jpg
गुंडेगाव फोटो