आरोग्याबाबत सखींना मार्गदर्शन
By Admin | Updated: August 17, 2014 23:34 IST2014-08-17T22:58:35+5:302014-08-17T23:34:03+5:30
अहमदनगर : आरोग्यविषयक व्याख्यान व प्रमाणपत्र वितरण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्याबाबत सखींना मार्गदर्शन
अहमदनगर : लोकमत सखी मंच आणि आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्था, जोशी हॉस्पिटल केडगाव व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यविषयक व्याख्यान व प्रमाणपत्र वितरण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धावपळीच्या युगात आरोग्य व्यवस्थित असेल तरच सखी आनंदी जीवन जगू शकतात़ ही निरोगी आरोग्याची काळाची गरज ओळखून नगरच्या आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्था व लोकमत सखी मंच यांच्या वतीने कोल्हापूर येथील प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ.शारंग पाटील यांचे ‘‘पंचभौतिक उपचारातून आरोग्य’ या विषयावर मंगळवारी (दि. १९) दुपारी ४ ते ६ या वेळेत तुषार गार्डन येथे व्याख्यान आयोजित केले आहे. याप्रसंगी नगर येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.आशुतोष जोशी (एम.एस. आॅर्थो., अ.नगर) यांचे ‘गुडघ्याची काळजी व शस्त्रक्रियेची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ नॅचोपॅथीचे डायरेक्टर डॉ.बाबु जोसेफ यांचेदेखील मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सखी मंच सभासदांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.हेमांगिनी पोतनीस, डॉ.हेमा सेलोत, डॉ.अरुण केसकर, योगतज्ज्ञ प्रसाद जोशी यांनी केले आहे.