कृषी संचालकांच्या उपस्थितीत कोरेगाव येथे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:46+5:302021-07-02T04:15:46+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे सोमवारी राज्याचे विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक विकास पाटील व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ...

कृषी संचालकांच्या उपस्थितीत कोरेगाव येथे मार्गदर्शन
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे सोमवारी राज्याचे विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक विकास पाटील व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या ठिकाणी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्ताने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्ये बाजरी पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्रास त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विकास पाटील यांनी लागवड तंत्रज्ञानाचे फायदे, बीज प्रक्रिया तंत्रज्ञान, एक गाव एक वाण, रासायनिक खतांची बचत व अंतर्गत मशागतीचे तंत्रज्ञान या विषयावर माहिती दिली. यावेळी पुणे विभागीय कृषी सहसंचालक बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी गवांदे, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कोळगावचे मंडल कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते, भोरे, तांबोळी, कृषी पर्यवेक्षक त्र्यंबके, कोरेगावच्या कृषी सहायक गायकवाड, निंबाळकर उपस्थित होते. शेतकरी प्रतिनिधी साकळाई बचत गटाचे प्रमुख महादेव इंगावले, सागर इंगावले, आप्पासाहेब हराळ, कार्तिक हराळ, जनार्दन हराळ, सतीश कुंडकर आदी उपस्थित होते.
300621\0743img_20210630_075611.jpg~300621\0743img_20210630_075646.jpg
कोरेगाव ता.श्रीगोंदा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्याचे कृषी संचालक विकास पाटील व कृषी विभागाचे अधिकारी. छायाचित्र---नानासाहेब जठार.~शेतकऱ्यांशी चर्चा करताना कृषी संचालक विकास पाटील.