गायकरवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:20+5:302021-09-13T04:20:20+5:30
कर्जत : बीड येथील केशर काकू कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी कर्जत येथील कृषिदूत प्रतीक वाल्मीक सोनवणे प्रतीक याने ...

गायकरवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कर्जत : बीड येथील केशर काकू कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी कर्जत येथील कृषिदूत प्रतीक वाल्मीक सोनवणे प्रतीक याने कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रासह विविध प्रकारची माहिती देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व त्याचे फायदे बोर्डोपेस्ट करण्याची प्रक्रिया, बीज उगवण क्षमता चाचणी, शेतीसाठी वापरात असणारे विविध एकत्रित कीटक, रोग व्यवस्थापन, वृक्षलागवड, बँकेच्या विविध योजना, मातीपरीक्षण, आदींची माहिती दिली. प्राचार्य डॉ. एस. शिंदे, डॉ. एस. एस. चव्हाण, डॉ. एस. पी. मोरे, प्राध्यापक बी. पी. मांजरे, डॉ. एस. टी. शिंदे, प्रा. बी. पी. तांबोळकर, प्रा. एस. व्ही. राठोड, प्रा. बी. डी. बामणे, प्रा. एस. एस. राठोड, प्रा. बी. डी. तायडे, प्रा. डी. एस. जाधव, प्रा. बी. आर. चादर, प्रा. एस. पी. शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.