कृषी जागरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:22+5:302021-02-05T06:36:22+5:30
माती, शेती अवजारांची पूजा करून एक दिवसीय कृषी जनजागराची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या महोत्सवात ...

कृषी जागरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
माती, शेती अवजारांची पूजा करून एक दिवसीय कृषी जनजागराची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या महोत्सवात कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, दुर्मीळ वनौषधी प्रदर्शन, देशी पशु गोवंश माहिती, कीटकनाशकांचे दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीविषयक, व्यवसाय व सेवेकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. जागतिक कृषी महोत्सवात सह्याद्री कृषिरत्न पुरस्कारप्राप्त मेजर ताराचंद गागरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, प्रभाकर म्हसे, सतीश इंगळे, मधुकर म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, इंद्रभान म्हसे, गोरक्षनाथ म्हसे, महेश हिवाळे, नीलेश हापसे, सुनील हिवाळे, राजू पेरणे, राहुल हिवाळे, अमोल म्हसे, महेश ढोकणे, संजय म्हसे, गायकवाड काका, भाऊसाहेब पवार, गणेश भोईटे, शिवदत्त म्हसे उपस्थित होते. सूत्रसंचालन गोरक्षनाथ माळवदे यांनी केले. अमोल म्हसे यांनी आभार मानले.
..
२५राहुरी कृषी जागर