शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी नगर जिल्हा विभाजनाचा अभ्यास करावा - सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:05 IST

जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा, असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

जामखेड : सरकारला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे तीनशे कोटी रुपये देण्यासाठी पैसे नाहीत. जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा आणि मगच जिल्हा विभाजनाबाबत बोलावे, असे जाहीर आव्हान युवक नेते व जनसेवा फाउंशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.जामखेड तालुक्यातील राजकीय पदाधिकारी यांची पालकमंत्र्यांबरोबर कोणाची सेटिंग आहे. याचे आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे. वेळ आल्यावर उघड करू, असा दम त्यांनी कार्यक्रमाला अनुपस्थित राहणा-या राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्ते यांना दिला आहे. जामखेड येथे जनसेवा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सुजय विखे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ होते. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर राळेभात,अंकुश ढवळे, अरुण वराट, बंकटराव बारवकर, किसनराव ढवळे, भारत काकडे, सुनील शिंदे, गजानन फुटाणे, मकरंद काशिद, अरुण जाधव, विशाल डुचे, मंगला भुजबळ, ज्योती गोलेकर, अरुण जाधव, नगरसेवक अमित जाधव, कैलास वराट, अशोक गिरमे उपस्थित होते.यावेळी डॉ. विखे म्हणाले, मी मूळ राजकारणी नाही. जिल्हा विभाजनावर जिल्ह्यातील एकही पुढारी बोलत नाही. फक्त पालकमंत्री बोलत आहेत. त्यांना विभाजन करून काय साध्य करायचे आहे, तेच कळत नाही. या विषयामुळे शिंदे इतर प्रश्न विसरून गेले आहेत. विभाजन करण्याअगोदर जामखेड तालुक्यातील एमआयडीसी, कुकडीचे पाणी, युवकांना रोजगार, तालुक्यातील प्रमुख कार्यालयांत असणारे प्रभारी अधिकारी राज संपवा व शेतक-यांना कर्जमाफीचे पैसे द्या, असे ते म्हणाले.

एक कोटींचा निधी आणला

मी अजून उमेदवारीची घोषणा केली नाही. माझा पवित्रा सावध राहणार आहे. जनतेला चांगला पर्याय मिळाला तर नक्की जनता स्वीकारते. राजकारणात आश्वासनापलीकडे जाऊन काम केले पाहिजे. आज जामखेडला येत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक कोटी निधी आणला आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे केली जाणार आहेत, असे विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेSujay Vikheसुजय विखेAhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड