पर्यटन विकासासाठी ‘नगर जल्लोष’चे पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:57+5:302021-06-09T04:26:57+5:30

या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहर ही ऐतिहासिक नगरी असून, या शहराला सुमारे ५३१ वर्षांचा वारसा लाभलेला आहे. ...

To the Guardian Minister of 'Nagar Jallosh' for tourism development | पर्यटन विकासासाठी ‘नगर जल्लोष’चे पालकमंत्र्यांना साकडे

पर्यटन विकासासाठी ‘नगर जल्लोष’चे पालकमंत्र्यांना साकडे

या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहर ही ऐतिहासिक नगरी असून, या शहराला सुमारे ५३१ वर्षांचा वारसा लाभलेला आहे. नगर शहरामध्ये ७० हून अधिक ऐतिहासिक वास्तू आहेत. नगर शहरात पर्यटन विकासाला मोठी संधी असून, पर्यटन विकासाला चालना मिळाल्यास शहराची भरभराट होईल.

ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांनी विविध बाबींची सविस्तर माहिती दिली. यावेळी उद्योजक जितेंद्र तोरणे, अजय म्याना, राहुल सप्रे, राकेश बोगा, योगेश ताटी, सचिन बोगा, इरफान शेख, विराज म्याना, अक्षय हराळे, बालाजी वल्लाळ, पंकज मेहेर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नगर शहराच्या पर्यटन विकासासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांना साकडे घातले. यावेळी ना. मुश्रीफ यां नाभुईकोट किल्ल्याच्या तिहेरी बुरूजाची प्रतिकृती, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती पुस्तिका ‘आपलं अहमदनगर’ भेट देण्यात आली.

Web Title: To the Guardian Minister of 'Nagar Jallosh' for tourism development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.