थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी रक्तदात्यांचे गट
By Admin | Updated: May 8, 2016 00:51 IST2016-05-08T00:31:29+5:302016-05-08T00:51:53+5:30
अहमदनगर : थॅलेसेमियाच्या एका रुग्णासाठी दरमहा एक किंवा त्यापेक्षा अधिक रक्ताच्या पिशव्यांची गरज असते.

थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी रक्तदात्यांचे गट
अहमदनगर : थॅलेसेमियाच्या एका रुग्णासाठी दरमहा एक किंवा त्यापेक्षा अधिक रक्ताच्या पिशव्यांची गरज असते. त्यासाठी जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्तदात्यांचे गट तयार करण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णांना रक्तदात्याची वाट पाहण्याची गरज राहणार नाही.
दरवर्षी ८ मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळण्यात येतो. बाळ पांढरट दिसणे, तोंडावर सूज येणे, अशी लक्षणे आणि लाल पेशीचा आकार, हिमोग्लोबिनचे प्रमाण यानुसार निदान केले जाते. मात्र, थॅलेसेमियाचे अंतिम निदान इलेक्ट्रोफोरेसिस या तपासणीद्वारेच होते. रुग्ण असलेल्या मुलांना दरमहा नवे रक्त देवून हिमोग्लोबिनचे प्रमाण १० ग्रॅमपर्यंत स्थिर ठेवावे लागते. रक्तामधून संक्रमित होणाऱ्या व्याधी रुग्णामध्ये संक्रमित होण्याचा धोका असतो. मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने न्यूमोनियासारखे आजार होतात. रक्तदात्यांचे गट तयार झाल्यास एकट्या पालकाला पळण्याची गरज भासणार नाही. जनकल्याण रक्तपेढीत शंभररुग्णांची नोंद झाली असून, या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात येत आहे़