स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:15+5:302021-05-31T04:17:15+5:30
माजी उपमहापौर दीपक सूळ, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, स्वा. जयंती उत्सव समितीचे प्रमुख मयूर जोशी, श्रीराम येंडे, ...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
माजी उपमहापौर दीपक सूळ, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, स्वा. जयंती उत्सव समितीचे प्रमुख मयूर जोशी, श्रीराम येंडे, उबेद शेख, अमोल भंडारे, उमेश नगरकर, संजय झिंजे आदींसह विविध क्षेत्रांतील नागरिक यावेळी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासारख्या महान स्वातंत्र्य योद्धाला अभिवादन करताना त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याचे स्मरण झाले आहे. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. नगरमध्ये दरवर्षी सावरकर जयंती उत्सव समितीच्यावतीने चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन होत असते. चौपाटी कारंजा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आमदार निधीतून लवकरच करण्यात येईल. प्रास्ताविक उत्सव समितीचे प्रमुख मयूर जोशी यांनी केले. यावेळी कैलास दळवी, श्रीपाद वाघमारे, महेश कुलकर्णी, सुशील भळगट, सोमनाथ मुळे, अरविंद मुनगेल आदी उपस्थित होते.