क्रांतिकारी पिल्ले यांना अभिवादन

By | Updated: December 8, 2020 04:18 IST2020-12-08T04:18:43+5:302020-12-08T04:18:43+5:30

अहमदनगर : काँग्रेस कार्यकर्ते व सरोष बॉम्ब प्रकरणातील स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारी रत्नम पिल्ले यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक, ...

Greetings to the revolutionary puppies | क्रांतिकारी पिल्ले यांना अभिवादन

क्रांतिकारी पिल्ले यांना अभिवादन

अहमदनगर : काँग्रेस कार्यकर्ते व सरोष बॉम्ब प्रकरणातील स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारी रत्नम पिल्ले यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक, नागरिक व भिंगार काँग्रेसच्या वतीने सोमवारी भिंगार येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, साहेबराव चौधरी, भिंगार काँग्रेस अध्यक्ष आर. आर. पिल्ले, नगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संजय सपकाळ, शामराव वाघस्कर, शारदा वाघमारे, मीनाताई घाटगे, रजनी ताठे, मोना घाटगे, शशिकांत पवार, जाहिदा शेख, रमेश कदम, अविनाश देडगावकर, महेश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी येलूलकर म्हणाले, पिल्ले यांच्या घरावर रसिक ग्रुपच्या वतीने नीलफलक लावण्यात येणार आहे.

Web Title: Greetings to the revolutionary puppies