विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST2020-12-17T04:46:00+5:302020-12-17T04:46:00+5:30
अहमदनगर : जामखेड रोडवरील एसीसी अँड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेत भारत-पाकिस्तान युद्धातील ऐतिहासिक विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यात ...

विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन
अहमदनगर : जामखेड रोडवरील एसीसी अँड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेत भारत-पाकिस्तान युद्धातील ऐतिहासिक विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यात आले.
आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) हे भारतातील लष्करी प्रशिक्षण संस्थेतील प्रमुख प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात विजय दिनानिमित्त शहीद झालेल्या जवानांना पुष्पांजली वाहण्यात आली. एसीसी अँड एसचे कमांडंट मेजर जनरल एस. झा यांच्यासह लष्करातील वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, विजय दिवसाचे औचित्य साधून सोलापूर रोडवरील प्रसिद्ध रणगाडा संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून हे संग्रहालय बंद होते.
------
फोटो - १६ विजय दिवस
एसीसी अँड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेत भारत-पाकिस्तान युद्धातील ऐतिहासिक विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यात आले.