जामखेडच्या एसटी आगारात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:17+5:302021-06-04T04:17:17+5:30
जामखेड : जय भगवान महासंघ व एसटी कामगारांच्या वतीने पुण्यतिथीनिमित्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ...

जामखेडच्या एसटी आगारात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
जामखेड : जय भगवान महासंघ व एसटी कामगारांच्या वतीने पुण्यतिथीनिमित्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
एसटी आगारात मागील सहा वर्षांपासून जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप पुण्यतिथी कार्यक्रम घेत आहेत. एसटी आगारात सकाळी दहा वाजता जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, आगार व्यवस्थापक महादेव शिरसाट, सचिन मासाळ, जय भगवान महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव लटपटे, विशाल गर्जे, सुग्रीव जायभाय, जगन्नाथ कराड, संपत गर्जे, बाळासाहेब सारूक, रघुनाथ वारे, आनंद भणगे, तात्या जायभाय, नकुल देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी आगार व्यवस्थापक महादेव शिरसाट यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा दिला.
---
०३ जामखेड मुंडे
जामखेड एसटी आगारात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना जिल्हाध्यक्ष रमेश सानप, आगार व्यवस्थापक महादेव शिरसाठ व इतर.