बाबुशेठ मुथा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:22 IST2021-02-11T04:22:19+5:302021-02-11T04:22:19+5:30

प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अजयकुमार बारगळ होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.व्ही. एम. झंवर ...

Greetings to Babusheth Mutha on the occasion of Punyatithi | बाबुशेठ मुथा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

बाबुशेठ मुथा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अजयकुमार बारगळ होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.व्ही. एम. झंवर उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक नागदे यांनी केले. क्रीडा अध्यापक बाबासाहेब पटारे यांनी आपल्या परिचयातून कै.बाबूशेठ मुथा यांचा जीवनपट विषद केला. ऋषिकेश कातोरे यांनी आभार मानले. केशव देशपांडे व तुषार मरकड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक भीमराज आव्हाड, गौतम मुथा, सुरेश मुथा, अक्षय मुथा, बबलू मुथा, पोपट मुथा, महावीर मुथा, उदय मुथा, शिवाजी मंडलिक, राजाभाऊ कुसमुडे, बाबासाहेब पटारे, अस्लम शेख आदी उपस्थित होते.

..

फोटो-१०मुथा पुण्यतिथी

Web Title: Greetings to Babusheth Mutha on the occasion of Punyatithi