४४० झाडे लावून मैत्रिणीला केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:16+5:302021-06-22T04:15:16+5:30

श्रीगोंदा : पाॅली फ्रेंड्स ग्रुपने स्व. अनिता राजेंद्र नलगे या मैत्रिणीच्या जन्मदिवसानिमित्त कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील शहीद भवन, माउली ...

Greeted my friend by planting 440 trees | ४४० झाडे लावून मैत्रिणीला केले अभिवादन

४४० झाडे लावून मैत्रिणीला केले अभिवादन

श्रीगोंदा : पाॅली फ्रेंड्स ग्रुपने स्व. अनिता राजेंद्र नलगे या मैत्रिणीच्या जन्मदिवसानिमित्त कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील शहीद भवन, माउली मंदिर, कोळाईदेवी मंदिर, स्मशानभूमी परिसरात ४४० वड, चिंच, सायप्रसची झाडे लावली. मैत्रिणीच्या स्मरणार्थ पाॅली फ्रेंड्स ग्रुपने इको फ्रेंडली उपक्रम राबविला.

गत महिन्यात अनिता नलगे यांचे कोरोनाने वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले. पती राजेंद्र नलगे यांनी पत्नीच्या स्मरणार्थ मैदोबा मंदिर, माउली मंदिराचा परिसर सोलरच्या माध्यमातून प्रकाशमान केला आहे.

या उपक्रमात अविनाश गुंजाळ,

सुशीला भरीतकर, राजू सपकाळ, दिनेश जाधव,

प्रमोद पत्रे, कमलाकर हांडे,

विजय जगदाळे, प्रमोद वैद्य,

शीतल लंके, संतोष डांगे,

राजेंद्र कापसे, राणी शेंडे, रेश्मा पठाण, सुनीता टोरपे, सुषमा गुंजाळ, स्वाती जिवडे यांनी श्रमदान केले.

यावेळी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेच्या सदस्या अनुराधा नागवडे, हरिदास शिर्के, सुनील जंगले, भैया लगड, हेमंत नलगे, वर्षा काळे, बाळासाहेब नलगे, मधुकर लगड, नितीन डुबल, सुभाष लगड आदी उपस्थित होते.

----

२१कोळगाव

कोळगाव येथे पाॅली फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Greeted my friend by planting 440 trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.