मूग, उडीद, सोयाबीन बहरले ; मात्र खोड माशीच्या प्रादुर्भावाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:55+5:302021-07-25T04:18:55+5:30
केडगाव : नगर तालुक्यात खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन सध्या जोमात आहे. मात्र काही पिकांवर विविध कीड रोगांचा ...

मूग, उडीद, सोयाबीन बहरले ; मात्र खोड माशीच्या प्रादुर्भावाची भीती
केडगाव : नगर तालुक्यात खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन सध्या जोमात आहे. मात्र काही पिकांवर विविध कीड रोगांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: खोड माशीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्याचा फटका उत्पादन घटण्यात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण तर काही प्रमाणात रिमझिम पाऊस पडल्याने गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे थोडाफार पाणीसाठा तयार झाला आहे. काही मंडलामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तेथील खरीप हंगामातील पिकांना अति पावसाचा फटका बसला आहे.
तालुक्यातील गुंडेगाव येथे मोठ्या प्रमाणात मूग, सोयाबीनची पेरणी झाली आहे. यंदा मृग नक्षत्रात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनीही तत्काळ पेरणी केली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. मात्र मागील आठवड्यात पाऊस सुरू असल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह इतर पिके बहरून आली आहेत. मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांना उन्हाची कमतरता भासत आहे. त्यामुळे पिकांवर रोग पडण्याची शक्यता आहे.
---
फोटो आहे
240721\img-20210723-wa0459.jpg
फोटो