एमआयडीसीतील इलेक्ट्रिकच्या गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:27 IST2019-06-02T10:49:59+5:302019-06-02T13:27:10+5:30
अहमदनगर एमआयडीसी तलाठी कार्यालयाच्या मागे असलेल्या मयूर इलेक्ट्रीक गोदामाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

एमआयडीसीतील इलेक्ट्रिकच्या गोदामाला भीषण आग
नवनागापूर : अहमदनगर एमआयडीसी तलाठी कार्यालयाच्या मागे असलेल्या मयूर इलेक्ट्रीक गोदामाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ अहमदनगर अग्निशामक दलाचे दोन बंब तर एमआयडीसीचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. सद्यस्थितीत आग आटोक्यात आली आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही.