नातू झाला, तरी महिलांचा सासरी छळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:37+5:302021-06-16T04:28:37+5:30
नॅशनल क्राइम रिपोर्टनुसार, विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारींचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ इतके आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २१.४ टक्के इतके ...

नातू झाला, तरी महिलांचा सासरी छळ सुरूच
नॅशनल क्राइम रिपोर्टनुसार, विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारींचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ इतके आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. नगर जिल्ह्यात २०२० या वर्षात कलम ४९८ अंतर्गत (विवाहित स्त्रीशी क्रूरपणा करणे) ३३९ तर मे २०२१ पर्यंत १९३ गुन्हे दाखल आहेत. तक्रार देणाऱ्या महिला या २० ते ५५ या वयोगटांतील आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात महिला हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहे. बहुतांशी महिला गेली अनेक वर्षे सासरी पतीसह सासू-सासऱ्यांचा अन्याय सहन करातात. मात्र, त्या तक्रार देत नाहीत.
----------------
मानपानाचं रडगाणं कायम
लग्नात चांगला हुंडा दिला नाही, भांडीकुंडी दिली नाहीत, यासह आम्हाला चांगला मानपान दिला नाही, यासह अगदी क्षुल्लक कारणातून ग्रामीण भागात सासरी पतीसह सासू-सासरे नवविवाहितांचा छळ करतात. बहुतांशी घरात ज्येष्ठ महिलांचाही पतीकडून छळ होतो. काही प्रकरणात मूल होत नसल्याने महिलांना त्रास दिला जात आहे. या त्रासाला कंटळून काही महिला शेवटी मृत्यूला कवटाळतात, तर काही पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करतात.
-----------------------
सासरी महिलांच्या छळाला अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. बहुतांशी वेळ पतीकडून पत्नीला त्रास देण्याचे प्रकार समोर येत असले, तरी घरातील सासू आणि नणंद यांची भूमिकाही महत्त्वाची असते. घरात महिलेने महिलेचा आदर केला, तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. सासूने सुनेला मुलीप्रमाणे तर सुनेने सासूला आईप्रमाणे संभाळावे, ही मानसिकता रुजली, तर घरात होणाऱ्या महिला हिंसाचाराच्या प्रमाणात घट होईल. मुलगा चुकीचा वागत असेल, तर आईने त्याला समजून सांगावे.
ॲड.अनुराधा येवले, सामाजिक कार्यकर्त्या
----------------------
२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -३३९
२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -१९३