जीप अपघातात आजी-नातवाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 16:45 IST2018-05-12T16:39:00+5:302018-05-12T16:45:47+5:30
केळी-कोतूळ घाटात खासगी वाहतूक करणाऱ्या जीपचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात आजी व नातवाचा दुर्दैवी अंत झाला. तर चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

जीप अपघातात आजी-नातवाचा मृत्यू
कोतूळ(जि.अहमदनगर) : केळी-कोतूळ घाटात खासगी वाहतूक करणाऱ्या जीपचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात आजी व नातवाचा दुर्दैवी अंत झाला. तर चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
वाघमारे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक केळी-कोतूळ येथील शुक्रवारी मध्यरात्री आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम उरकून मुंबई येथे नोकरीच्या ठिकाणी जात होते. यावेळी केळी-कोतूळ येथील घाटातील अवघड वळणावर कमांडर जीपचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने सदर जीप खोल खड्ड्यात कोसळली. यात कल्पना अशोक वाघमारे (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या बरोबर त्यांचा नातू आयुष आनंदा वाघमारे (वय २) हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा लोणी येथे उपचारादरम्यान मृत झाला. तर भारत माळवे, सुभाष माळवे (रा.बदगी बेलापूर), विशाल अशोक वाघमारे, भास्कर तुकाराम वैराळ हे (रा. केळी कोतूळ) जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे, हेड कॉन्स्टेबल सुनील साळवे, संदीप पांडे, दिलीप पानसरे, गोविंद मोरे, तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाताच्या घटनेची नोंद केली आहे.